बस गावाबाहेर आल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला, महानगरातून या छोट्या गावात आपण पोहोचलो. आपल्या वाट्याला हेच गाव होतं
मधू बस स्थानकावर आला, तेव्हा त्याला कळालं की, गावाकडं जायला गाडी सकाळी सात वाजता होती. आता काय करायचं? इथंच मुक्काम करून सकाळी सातच्या गाडीनं निघण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानं स्वस्तातल्या स्वस्त लॉजवर विचारपूस केली. राहणं, जेवण आणि परतीचं तिकीट या खर्चाचा मेळ बसत नव्हता. पैसे कमी पडत होते. त्याच्या मनात अंधुकसा विचार आला. आणि तो चालत गावाच्या टोकाला आला.......